शिंडलर्स लिस्ट ही अशा देवामाणसाची कथा आहे, ज्यान स्वतः जर्मन असून, स्वतःच सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. लिओपोल्ड पेफरबर्ग हा ऑस्कर शिंडलरने वाचवलेल्या ज्युंपैकी एक. ही जगावेगळी कथा लोकांसमोर आणण्यासाठी त्यानं अतोनात कष्ट केले. थॉमस केनेलीसारख्या सिद्धहस्त प्रतिभावंताने ही कथा १९८३ साली लिहिली.
जगभरात तिला बुकर पुरस्कारासह अनेक मानसन्मान लाभले. विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या ऑस्कर शिंडलरचं नाव या कलाकृतीमुळे द्वितीय महायुद्धाच्या इतिहासात चिरंतन झालं.